बारामती(वार्ताहर): दि. 01 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 18 तर ग्रामीण भागातून 23 रुग्ण असे मिळून 41 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 167 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 18 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. कोणाचाही अहवाल प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. 81 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 17 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 41 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 326 रुग्ण असून, बरे झालेले 2 हजार 582 आहे तर मृत्यू झालेले पंच्च्याऐंशी आहेत.
“काल माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत पिंपळी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 46 संशयितांची एंटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 08 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे. त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 3326 + 8 = 3324 झालेली आहे.
काल खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 20 नमुने घेण्यात आले त्यापैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.आज मितीस तरी रुग्ण संख्या 50 च्या आतच आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे.
ग्रामीण भागात रुग्णाचा जो आकडा वाढत आहे त्यावर अजुन लक्ष देण्याची गरज आहे. बारामती शहरात ज्याप्रमाणे पोलीस मास्क न लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करतात त्याप्रमाणे ग्रामीण भागात वेशीवर फक्त मास्क न लावणाऱ्यावर कारवाई केली जाते. गावात मात्र विना मास्क फिरणारे दिसतात त्यामुळे गावात सुद्धा त्याच प्रमाणात कारवाई झाली पाहिजे