बारामती(वार्ताहर): उत्तर प्रदेश येथे हाथरस जिल्ह्यातील वाल्मीकि समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ बारामती येथील उपविभागीय अधिकारी यांना मेहतर वाल्मीकी समाजच्या वतीने निषेधचे निवेदन देण्यात आले व प्रांत कार्यालय समोर घोषणा बाजी करून घटनेचा निषेध करण्यात आला.
मेहतर वाल्मीकि विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष अड धीरज लालबीगे यांनी उत्तर प्रदेशच्या सरकारच्या गलथान कारभाराबाबत कठोर शब्दात मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंद लालबिगे, अजय लालबिगे, संजय मुलतानी, गोपाल वाल्मीकी, प्रदीप लालबिगे, योगेश लालबिगे, धर्मेंद्र कांगडा, मुकेश वाघेला, बलवंत झुंज, परवेश बागडे, आतिश लालबिगे, साजन लालबिगे, नीलेश बागडे, रणधीर लोहाट, ओमकार देवकाते, आकाश वाडिले इ.प्रमुख कार्यकर्ते सह बरोबर समाजातील लोक उपस्थितीत होते.

आरोपींनी या मुलीची जीभ कापली व मानेची हाडे मोडली इतक्या निष्ठुर पणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली नाही. तिच्या मृत्यु नंतर तिचा मृतदेह हा कुटुंबाच्या ताब्यात न देता रात्री 3 वाजता परस्पर जाळला ही घटना अतिशय निंदनीय आहे. यामध्ये कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यासारखे झालेले आहे. यातील आरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी व तो खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर विशेष न्यायालय मध्ये चालवण्यात यावा. यामधील संबंधित पोलिस अधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर केला व त्या मुलीचे मृतदेह कुटुंबच्या परस्पर रात्री 3 वाजता जाळला याची चौकशी होऊन त्या संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार करवाई व्हावी. अशा प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले.