तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‌‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा‌’अंतर्गत क्विकहिल फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

बारामती(प्रतिनिधी)ः येथील तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा क्विकहिल फाउंडेशनसोबत ‌‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा‌’ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे तसेच समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या शैक्षणिक सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप आणि क्विकहिल फाउंडेशनचे अजय शिर्के यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी सदर उपक्रम हे काळाची गरज आहे तसेच उपक्रमासाठी सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमांतर्गत ‌‘कमवा आणि शिका‌’ या तत्त्वावर विद्यार्थ्यांना कार्य करताना आर्थिक सहाय्य देखील दिले जाणार आहे. तसेच, या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, सायबर जागरूकता मोहिमा आणि प्रात्यक्षिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत असून, त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी विकसित होत आहे.

या सामंज्यस्य करारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य, अधिष्ठाता, उपक्रम समन्वयक प्रा. सलमा शेख यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुपमा काटकर, सहयोगी संचालक अजय शिर्के, कार्यसंघ सदस्य गायत्री केसकर आणि दिपू सिंग यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!