बारामती(प्रतिनिधी): लांबलेला पाऊस लवकर पडावा, बळीराजा सुखी होऊ द्या व एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर चरणी पंच नद्यांच्या पाण्याचा महा जल अभिषेक सोमवार दि.29 जन 2026 रोजी सायं. 4.30 वा. आयोजित केला असल्याचे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना पुणे जिल्हा (बारामती) व सकल हिंदू समाज बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास बारामती लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख व मुंबई महानगरपालिकेचे गटनेते किरण लांडगे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हिंदू धर्म, संस्कृती आणि कुंभमेळ्याशी संबंधित विषयांवर स्पष्टपणे आपले विचार मांडणारे, श्री काळाराम मंदिर नाशिकचे विश्वस्त आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांचे भारताच्या पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तरी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.