आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाझिया खान विरोधात मुस्लीम समाजातर्फे बारामती शहर पोलीसात निवेदनः देशभरातून मुस्लीम समाजातून नाराजी

बारामती(प्रतिनिधी): पॉडकास्टमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांच्याबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान यांच्याविरोधात देशभरातील मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विविध ठिकाणी पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामती शहर मुस्लीम समाजाच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन याठिकाणी निवेदन देण्यात आले.

धर्म, श्रद्धा व सामाजिक सलोखा यांचा आदर राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून, संबंधित वक्तव्यांची सत्यता, उपलब्ध पुरावे व लागू कायदेशीर तरतुदी यांचा विचार करण्यात यावा.

सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून, खान विरूद्ध कायद्याने गुन्हा सिद्ध होत असेल तर योग्य त्या कलमानुसार एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. समाजामध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या या प्रकरणाकडे नागरिकांसह विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे लक्ष लागले असून, पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

नाझिया खान ही भारतीय जनता पार्टीची नेत्या आहे. एखाद्या संघटनेला दहशतवादी घोषित केले असता, त्यावर या खान ने संताप व्यक्त केला होता. एक प्रकारे दहशतवादी संघटनेला समर्थन केलेले असताना सुद्धा सरकार कोणतीही ठोस कारवाई करीत नाही. तसेच कुंभमेळ्यात एका लग्नाबाबत आक्षेप घेत हे लग्न नसून लव्ह जिहाद असल्याचा आरोप करीत आहे.

नाझिया खान यांच्या म्हणण्यानुसार दहशतवादी घोषित केलेली संघटना स्वतःसाठी नव्हे तर आपल्या धर्माला वाचविण्यासाठी केलेल्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आली आहे. बरं झाले ही घोषित झालेली संघटनेचा मोरक्या मुस्लीम नाही, अन्यथा नाझिया खान सह ही संघटना, संघटनेत काम करणारे, पाठिंबा देणारे व या संघटनेचे नाव घेणारे दहशतवादी ठरले असते.

निवेदन देते समयी मुनीर तांबोळी यांनी समाजाची भूमिका मांडली व सदर महिलेवर तातडीने कारवाई करण्यात यावी असे सांगितले.

या निवेदनावर अजिज जाफर सय्यद, अरबाज फिरोज खान, आरिफ पठाण, निसार बशीर शेख, सलमान युसूफ बागवान, जहीर बागवान, समीर शौ.शेख, नाजीम गणीभाई डफेदार, मुआज फिरोज बागवान, रियाज अ.मुलाणी, अशरफ अं.अन्सारी, अब्दुलगणी, समीर अस्लम पठाण, आरबाज सईद खान, ईज्हारूल हमीद बागवान, सलमान आलताफ बागवान, शोहेब बागवान, मोहसीन बागवान, जाकीर सत्तार काझी, वसीम कैय्युम बागवान, सोहेल बागवान, वसीम बागवान, बिलाल तांबोळी, साकीब बागवान, आय्युब तांबोळी, आरिज चौधरी, मुन्ना बागवान, वसीम कुरैशी, तसलीम मन्नान शेख, आक्रम अजीज बागवान, मजहर शेख बेलतदार, अब्दुल रहेमान बेलदार, आसिफ शेख, आरबाज शौकत बागवान, आयाज शेख, सलिम जहागीदार, सोहेल मजीद बागवान, सुहैल समीर आतार, रिहान अहमद बागवान, आवेज अब्दुल तांबोळी, मुआज अस्लम तांबोळी, मुनीरभाई तांबोळी, आरबाज तांबोळी, उस्मान शेख, इम्रान बागवान, आसिफभाई बागवान, एजाज आतार, इरफान गुलामअली शेख, नजीर गुलाब मुलाणी, सर्फराज शादुल्ला पिंजारी, मोहसीन रशिद बागवान, कासम हसन कुरैशी, शब्बीर कबीर खान, आलताफ अब्दुलकरी शेख, आफरोज हारूण बागवान, कैय्युम अजिज शेख, तौसिफ आतार, आशपाक शेख, आसिफखान पठाण, समीम अनसारी, महंमद शेख, आरिफ इस्माईल बागवान, फारूख आसिफ सय्यद, जमीर इस्माईल शेख, जिशान झारी, तोसिफ गणी शेख, सलिम हसन, मोहसीन महेबुब बागवान, शाहीर कुरैशी, मुजाहीद शेख, अमीर आतार, जिशान फिरोज बागवान, अमिर ख्वाजाभाई सय्यद यांनी सह्या केलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!