उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख : सुनेत्रावहिनींची घेतली भेट

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःखमहाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!