अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत – व्हीएसआरचे अधिकारी विजयकुमार सिंह

बारामती(प्रतिनिधी): विमानाला कोणतीही समस्या नव्हती. विमान 100 टक्के सुरक्षित होते. विमानाचा क्रू बऱ्यापकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल असे व्हीएसआरचे अधिकारी विजयकुमार सिंह यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, डिजीसीएच्या चौकशीतून खरे कारण समोर आल्याशिवाय राहणार नाही.

व्हीएसआर व्हेचंर्स प्रा.लि. ही नवी दिल्लीची कंपनी आहे. सन 2011 मध्ये स्थापना झालेली आहे. विजयकुमार सिंह आणि रोहित सिंह यांच्याकडून सदर कंपनी चालवली जाते. व्यावसायिक प्रवासाची सेवा देण्यासाठी या कंपनीकडून विमान पुरवले जातात.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीला 15 वर्षांहून अधिक काळ विमान चालविण्याचा अनुभव आहे. कंपनीकडे 60 वैमानिक आहेत आणि हवाई प्रवाशांनी 99 टक्के समाधान व्यक्त केल्याचा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. अशी माहिती कंपनीकडून देण्यात येत आहे.

या अपघातात कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड महत्वाचा नसून, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे विमान अपघात झाला. बारामतीचे नुकसान नसून संपूर्ण राज्य व देशाचे नुकसान झालेले आहे. बारामतीचा प्रत्येक तळागळातील कार्यकर्ता दादा..परत या, तुमची आम्हाला गरज आहे असा हंबरडा फोडलेला आहे. हा ट्रॅक कसा भरून काढणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!