टॉय‌’ या जातींच्या श्वानांची स्पर्धा : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती(प्रतिनिधी):कृषिक प्रदर्शनात टॉय‌’ या जातींच्या श्वानांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत किरण दळवी (ब्रीड पोमिग्रेन रू.5 हजार व चषक) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

गुरुवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. आज अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील जिल्ह्यांमधून येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी गर्दी केली होती.

प्रमुख भेटीमध्ये श्रीमती अंजली रमेश, आय. ए. एस, मृदा व जलसंधारण आयुक्त, संभाजीनगर, युगेंद्रदादा पवार, उद्योजक यांचा समावेश होता. त्यांचे स्वागत ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी केले. नंतर मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली.

आज प्रदर्शनाच्या अनुषंगाने ‌‘टॉय‌’ या जातींच्या श्वानांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मा. श्री. युगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते ट्रॉफी चे वितरण करण्यात आले.

श्वान स्पर्धातील विजेते व पारितोषिके -*द्वितीय क्रमांक: कार्तिक शिंदे (ब्रीड शिझू रु. 3 हजार व चषक) * तृतीय क्रमांक: आकाश मोरे (ब्रीड कॉकर स्पायनर रु.2 हजार व चषक) * उत्तेजनार्थ : गौरव नलावडे (ब्रीड छीवावा व चषक)

24 जानेवारी 2026 रोजी शेवटचा दिवस असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र , बारामती तर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!