सचिन सातव यांचा बारामती बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

बारामती(प्रतिनिधी): विश्वास, भागीदारी आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक असलेल्या दि बारामती सहकारी बँकेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.

यावेळी श्री. सातव यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचे आभार मानले व पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. बँक आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यामध्ये सचिन सातव यांनी घेतलेली ठाम भूमिका महत्वाची ठरली.

बँकेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर ओंकार किशोर देवळे यांची व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

दि बारामती सहकारी बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू. 2247 कोटी, कर्जवाटप रू. 1382 कोटी व गुंतवणूक रू. 1009 कोटी तर बँकेचा निव्वळ एन.पी.ए. 1.46% व भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) 16.19% अशी बँकेने प्रगती केलेली आहे. बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत 36 शाखा व 1 विस्तारित कक्ष कार्यरत आहे.

या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्षा सौ.नुपूर शहा (वडूजकर), तज्ञ संचालक प्रितम पहाडे (सी.ए.), ॲड. शिरीष कुलकर्णी-अध्यक्ष व्यवस्थापन मंडळ तसेच संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, विजयराव गालिंदे, देवेंद्र शिर्के, उध्दव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, संचालिका डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक ॲड. रमेश गानबोटे तसेच कार्यकारी संचालक विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!