शेतकरी, युवा उद्योजक व विद्यार्थी आणि महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता मार्गदर्शन

बारामती(प्रतिनिधी): बारामती तालुका व शहरातील शेतकरी, युवा उद्योजक व विद्यार्थी आणि महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता समन्वयक अश्विनी बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांचे संयुक्त विद्यामाने आर्थिक साक्षरता अभियानाची सुरुवात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे व बारामती मुख्य शाखेच्या अंतर्गत मुख्य शाखा अधिकारी संदीप जगताप व सर्व बँकांचे शाखा अधिकारी आणि विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

तालुका व शहरातील उपशाखा बँकांमार्फत बचत गटातील महिलांसाठी विविध उद्योगांना देण्यात येणारे सामूहिक व वैयक्तिक कर्ज योजना, बचतगटांना कर्जावर चार टक्के व्याज परतावा, आयटीआय,डिग्री, डिप्लोमा, आयटी इंजिनियर्स,प्रशिक्षित युवा उद्योजक कर्ज योजना व बँकेच्या विविध कर्ज योजना,शासकीय विविध महामंडळे कर्जा अनुदान योजना, शेतकऱ्यांसाठी झिरो टक्के व्याज दराने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज, अल्प व दीर्घ मुदत कर्ज योजना, कुक्कुटपालन, शेळीपालन, गायी पालन, मत्स्यपालन योजना आदी कर्ज योजनाबद्दल तसेच संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थींचे दोनशे रुपयांमध्ये बचत खाते, बचत गटातील महिलांसाठी पाचशे रुपयांमध्ये बचत खाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या इंटरनेट बँकिंग सेवा सुविधा उदाहरणार्थ बँकेचे अँप, फोन पे, गुगल पे, विविध व्यवसायांकरिता स्कॅनर सुविधा, एटीएम कार्ड सुविधा, चारशे छत्तीस रुपयांमध्ये जीवनज्योति विमा, वीस रुपयांमध्ये सुरक्षा विमा तसेच कॉलेजमधील व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व कर्ज योजना, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अनुदान,मागासवर्गीय शिष्यवृत्ती, एससी,एसटी,ओबीसी,व्हीजे एनटी, ई डब्ल्यू एस योजना,शालेय शिक्षण शिष्यवृत्ती,राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती,अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व्याजदर,विदेशी व शिक्षण देशांतर्गत शैक्षणिक कर्ज चाळीस लाखापर्यंत कर्ज योजना आदी शैक्षणिक योजनांबद्दल माहिती विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती एमआयडीसी याठिकाणी तसेच पिंपळी जळोची, काटेवाडी, गुणवडी मार्केट यार्ड, खांडज,पारवडी, अंजनगाव- देऊळगाव रसाळ, डोर्लेवाडी या ठिकाणी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व विमा फॉर्म आणि बँक खाती काढून घेतली. त्याचप्रमाणे तालुक्यातील उर्वरित बँकांमार्फत देखील शेतकरी,महिला बचत गट व विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती अश्विनी बनसोडे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उत्तुंग अशी गगन भरारी घेतली आहे व राज्यात नंबर एकची कोट्यावधींची उलाढाल करणारी आणि प्रचंड नफा प्राप्त करणारी सहकार क्षेत्रातील बँक बनली असून बँकेचा सर्वांगीण विकास अजित पवार यांचे माध्यमातून झपाट्याने होत आहे. तसेच बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने आणि बँकेचे असंख्य ग्राहक आणि हितचिंतकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहोचली असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी केले. तसेच शेतकरी, बचत गटातील महिला, युवा उद्योजक,विविध क्षेत्रात काम करणारे व्यवसायिक आदींनी बँकांच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बारामती मुख्य शाखेचे व्यवस्थापक संदीप जगताप साहेब यांनी शेती कर्ज, बिगर शेती कर्ज, ग्रामीण व शहरी भागातील ग्राहक व शेतकरी कर्ज योजना, झिरो टक्के व्याजदराने तीन लाखापर्यंत पीक कर्ज, शेतीपूरक व्यवसाय कर्ज,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत शेती कर्ज, बँकेच्या शाखेमार्फत थेट वैयक्तिक कर्ज, कृषी पर्यटन कर्ज, योजना सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप कर्ज योजना, सोनेतारण त्वरित कर्ज,योजना, पगारदार नोकरदार पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, चारचाकी किंवा दुचाकी कर्ज व्यापारी नजर गहाण कॅश क्रेडिट कमाल कर्ज मर्यादा, पगारदार नोकरांसाठी कॅश क्रेडिट कमाल कर्ज मर्यादा,नॉन फॉर्म सेक्टर कर्ज, औद्योगिक कमाल कर्ज योजना, महिला स्वयंसहाय्यता बचत गट कमाल मर्यादा, इंटरनेट बँकिंग व बँकेमार्फत राबवल्या जात असलेल्या विविध कर्जयोजनांची माहिती दिली व शेतकरी, महिला युवाउद्योजक, उद्योजयिका, विद्यार्थ्यांनी बँकांच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!