बारामती(प्रतिनिधी): एखाद्या पक्षाची सभासद नोंदणी म्हणजे पक्षाच्या विचारधारेचा भाग बनून पक्षाच्या कार्यात सहभागी होण्याची नाव नोंदणी म्हणता येईल. पिंपळी (ता.बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची क्रियाशील सभासद नोंदणी लक्षवेधी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्राथमिक क्रियाशील सभासद पुस्तकांचे सभासद नोंदणी अभियान मध्यंतरी पार पडले. सौ.बनसोडे यांनी पिंपळी लिमटेक येथील स्थानिक ग्रामस्थ व बचत गटातील तीनशे महिला व युवतीना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक क्रियाशील सभासद करून घेतले.
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात गाव पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला पदाधिकारी यांचे मार्फत करण्यात आलेली नावनोंदणी लक्षवेधी ठरली आहे. त्यांनी आतापर्यंत पन्नास सभासद पुस्तके भरली आहेत. त्यांचे या पक्षीय कार्याचे कौतुक बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी कौतुक केले.
अश्विनी बनसोडे यांचा आदर्श पक्षातील इतर महिला पदाधिकाऱ्यांनी घ्यावा व पक्ष संघटना वाढवून बळकट करावी. तसेच तळागळातील घटकांपर्यंत पोहचून पक्षाचा नावलौकीक वाढवावा असे श्री.होळकर व श्री.शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.