बारामती(प्रतिनिधी): येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या एकता ग्रुपतर्फे बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये नगराध्यक्षांसह सर्व 41 नगरसेवकांचा जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.10 जानेवारी 2026 रोजी जगदंबा मंगल कार्यालय, जुना मोरगाव रोड, बारामती याठिकाणी रात्रौ 7 वा. आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभास दि मुस्लीम को-ऑप बँकेचे चेअरमन तन्वीर पी.ए.इनामदार, व्हा.चेअरमन ॲड.अय्युबभाई शेख व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते संपन्न राहणार आहे. यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार होणार असल्याचे आयोजक दि मुस्लीम को-ऑप बँकेचे संचालक व नवनिर्वाचित नगरसेवक आलताफ सय्यद यांनी कळविले आहे.
तरी जास्तीत जास्त बांधवांनी व एकता ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन एकता ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.