बारामती(प्रतिनिधी)ः 29 डिसेंबरला बारामती व्यापारी महासंघ व दि बारामती मर्चंटस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा जाहीर सत्कार समारंभ श्री विमलचंद जैन भवन, नवीन कोर्टासमोर, भिगवण रोड, बारामती याठिकाणी सायं.7 वा. आयोजित करण्यात आला असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशिलकुमार सोमाणी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांना सरकारी धोरणांबद्दल मार्गदर्शन करणे, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देणे आणि सरकार तसेच जनतेमध्ये दुवा म्हणून काम करणे ही ठाम भूमिका व्यापारी महासंघ घेत आलेले आहे. वेळोवेळी व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे, नवीन धोरणांसाठी लॉबिंग करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे यांचा समावेश असतो.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, दि बारामती मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, सेक्रेटरी निलेश दोशी यांनी केले आहे.