बारामती(प्रतिनिधी): ॲमेनिटी स्पेस, ओपन स्पेस बाबत आरक्षण यादी कोण करण्यास सांगते, कसे आरक्षण फायनल होते याबाबत बारामती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे निकटवर्ती विशेषतः प्रतीदादांच्या टिमचा सदस्य समजल्या जाणाऱ्यांचे व्हॉटस्ॲप स्टेटस् व व्हायरल झालेल्या पोस्टमुळे दादा, हे करायला सांगता का तुम्ही? अशी चर्चा ज्यांच्या जागेवर आरक्षण पडले व ज्यांच्या जागेवर यापुढे पडणार आहे त्यांच्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
बारामती नगरपरिषद हद्दीत आरक्षण कोणाच्या सांगण्यावरून टाकले जाते हे बारामतीच्या नेत्यांनी एकदा भर सभेत जाहीर करावे. नेत्यांना याबाबत काहीच कल्पना होत नसेल तर प्रतीदादांची हाकलपट्टी करावी अशीही मागणी नागरिकांमध्ये होताना दिसत आहे. नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र जर कोण रचीत असेल तर त्यास बारामतीकर कधीही माफ करणार नाही असेही बोलले जात आहे.
असे प्रतीदादा जर नेत्यांच्या नावाखाली काम करीत असेल तर ही खूप खेदाची बाब आहे. एका स्टेटस्मध्ये तर पगार नगरपरिषदेचा काम मात्र नगरपरिषद विरूद्ध असा व्यक्ती कोण? नगरपरिषदेची गोपनीय माहिती बाहेर पुरविणे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी आरक्षणाबाबत माहिती मागितल्यास, प्रिंट नाही, प्रिंट काढणारा बाहेर आहे, दुकान बंद आहे असे सांगून ज्याठिकाणी काम केले त्यास फोन आल्यास वरील कारणे सांगा असे सांगावयास लावणारे कोण?
हा नगरपरिषदेचा कर्मचारी नगरपालिकेत कमी जहाजावर जास्त असतो. हा नगरपरिषदेचा कर्मचारी ज्याठिकाणी काम तेथील माहिती लपवणे आणि बाहेर देणे असे कृत्य करीत असेल तर अशा गद्दारांना नगरपरिषदेतून हाकलपट्टी करण्याची गरज आहे. जागेचे गट क्रमांक लिस्ट तयार करून मोजमाप करायचे, डिपी पार्ट घ्यायचे, जागा बघायची आणि आरक्षण लिस्ट तयार करून आरक्षण टाकायचे एवढे अधिकार या कर्मचाऱ्यास आहे.
सातव, पोटे, सस्ते, गालिंदे, देशमुख, चौधर, पाटील कुठे कुठे कोणाची जागा कुठे आरक्षण टाकायचे काय करायचे सगळी कुंडली उतारे या प्रतीदादाकडे आहे. त्यामुळे तुम्ही कधी यांना दुखावले तर नव्हते ना? असेही स्टेटस्वर ठेवल्याने चर्चेला उधान आले आहे.
नेत्यांच्या जवळ कोण असणार आणि कोणाला लांब ठेवायचे आणि विशेष नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा हे प्रतीदादा ठरवणारे कोण? पुढे असेही म्हटले आहे की, आमच्यावर गुन्हा दाखल करा, जेलमध्ये टाका पण तुमचे सर्व कांड समोर आणल्याशिवाय राहणार नाही. नेत्यांना सुद्धा कळूद्या त्यांच्या मागे हे लोक काय काय करतात आणि कशी नेत्याची व नागरिकांची दिशाभूल करतात.
पौराणिक मारूती मंदिर स्थलांतर करण्याचा घाट कोणाचा, नेत्यांच्या नाव वापरून कित्येक लोकांना गंडा घालणारे कोण? मुख्याधिकारी यांच्या पत्रावर बोगस सह्या करून त्याचा गैरवापर करणारे कोण? अशी लोकं नेत्यांचे जीव की प्राण असू शकतात हेच न उलघडणारे सत्य आहे.
नगरपरिषदेतर्फे कामं वाटप असेल, तिकीट वाटप असेल किंवा विकास असेल तो कोणाचा होतो. जो प्रतीदादांच्या जवळ त्यांची कामे होताना दिसतात. जो जवळ नसतो त्यास कोंडीत पकडण्याचे काम केले जाते. या कृत्यामुळे नेत्यांचे फॉलोअर्स कमी होऊन प्रतीदादांचे फॉलोअर्स वाढत असल्याचे दिसत आहे.