बारामती(प्रतिनिधी): बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्र.5 ब च्या उमेदवार ऋतुजा प्रताप पागळे यांनी प्रचारात घेतलेली आघाडीमुळे त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जातीय गटबाजीचा सुर चढू लागल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.
बारामती नगरपरिषदेतील वाढीव हद्द म्हणजे जळोची याठिकाणी झालेला विकास, लोकांचे उंचावलेले राहणीमान याचा विचार केला असता येथील प्रभाग क्र.5अ, 6अ व 6ब बिनविरोध झाले आहे. याचे सर्व श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना जाते. आतापर्यंत अजित पवार यांनी कोणत्याही गटा-तटाचा किंवा जाती, पातीचा विचार न करता विकास केला. मग प्रश्न निर्माण होतो प्रभाग क्र.5ब मधील सर्वसाधारण गटातील महिला बिनविरोध का झाली नाही याचे काहींनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
प्रभाग क्र.3ब चा विचार केला असता, सर्वसाधारण महिला प्रवर्गात ओबीसी महिला देण्यात आली. याठिकाणाहून एकही अर्ज सर्वसाधारण महिलेचा येणार नाही याची दक्षता 5ब च्या उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांनी घेतली होती, दिलेला शब्द पाळला.
प्रभाग क्र.5अ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधातील जे उमेदवार होते त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने सदरची जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. त्याचप्रमाणे प्रभाग क्र.6अ व 6ब मधील सर्वसाधारण गटातील दोन्ही उमेदवार बिनविरोध करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले. 5अ,6अ व 6ब प्रमाणे 5ब बिनविरोध करण्यात पक्षाला अपयश आले ही खूप मोठी शोकांतिका आहे.
प्रभाग 5अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधातील उमेदवार अर्ज माघारी घेतात आणि 5 ब मध्ये राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या विरोधातील उमेदवारी मागे घेण्यास नकार का? प्रभाग क्र.5ब मधील पक्षाच्या विरोधातील महिला प्रभाग क्र.5अ मध्ये उमेदवारी मागे घेणाऱ्यांची पत्नी आहे. एका ठिकाणी अर्ज माघार आणि एका ठिकाणी अर्ज कायम ठेवल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याला मतभेद, मनभेद का जातीय गटबाजी म्हणायचे हेच येथील नागरिकांना कळाले नाही.
प्रभाग क्र.5अ चे उमेदवारांना ओबीसीचे नेते म्हणून सर्वत्र गणले जाते. जहालमतवादी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घेत ते मैदानात उतरलेले आहेत. तरी सुद्धा 5ब च्या उमेदवारांना जातीय गटबाजीला सामोरे जावे लागत असेल तर ही खूप खेदाची बाब आहे. 5अ, 6अ व ब बिनविरोध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी तन-मनाने 5ब चा उमेदवार बहुसंख्य मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव,शाहु, फुले व आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष म्हणून गणला जाईल.
जळोची येथील प्रभाग 5ब जर सोडला तर 5अ, 6अ व ब चा बारामती नगरपरिषदेतील इतर प्रभागाने आदर्श घेणे गरजेचे आहे. अपक्ष व काही पक्षातील उमेदवारांनी बारामतीचा विकास व अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत अर्ज माघारी घेऊन बिनविरोध उमेदवार निवडून दिले. मग हाच विश्वास व विकास 5ब साठी मागे का? असाही प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.
येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी प्रभाग क्र.5ब चे उमेदवार ऋतुजा प्रताप पागळे यांना बहुसंख्य मताधिक्याने निवडून पाठवू असा सुर सध्या जळोची येथे विशेषतः प्रभाग क्र.5 मध्ये नागरिक बोलताना दिसत आहेत.