बारामतीः राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी युवक व्यसनापासून दूर रहावा, व्यसनाच्या अधीन जावू नये म्हणून वेळोवेळी राज्य सरकार या नात्याने ठाम भूमिका घेतली. बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 मध्ये दादा, तुम्ही दारूड्याला नगरसेवक पदाचे तिकीट दिले. नामनिर्देशक दाखल करताना याने एन्ट्री केली. या दारूड्या नगरसेवकाची चांगलीच चर्चा नगरपरिषदेत रंगली होती.
बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालना बाहेर पत्रकार व काही प्रतिष्ठीत व्यक्ती बसले होते. त्याठिकाणी हा व्यक्ती आला, त्यास एका पत्रकाराने विचारले तुमचे तिकीट फिक्स झाले ना? या बहाद्दराने तुम्हालाच माहिती असे म्हणून स्मीतहास्य केले. याच पत्रकारासमोर माळेगाव कारखान्याचे संचालक बसले होते. त्यांनी चेहऱ्याचा चंबु केला, मी म्हणालो काय झाले त्यांनी सांगितले दारूचा भपका आला.
या दारूड्याला नगरसेवक पद मिळाले म्हणून की नाही मिळाले म्हणून दारू पिला याबाबत पत्रकार व प्रतिष्ठीतांमध्ये चर्चा सुरू होती. या दारूड्याचे नाव कोणी सूचविले, यास सूचक व अनुमोदक कोण याबाबत माहिती घेणे महत्वाचे आहे. असे जर नगरसेवक नगरपरिषदेत प्रभागाचे नेतृत्व करणार असतील तर या प्रभागाचे काय होईल.
एकीकडे ना.अजित पवार यांनी व्यसनी माणसाबाबत भरसभेत नाराजी व्यक्त करायची किंवा एखाद्या व्यसनी माणूस मध्येच काही बोलला तर त्याची हजेरी घेत असे. मात्र, आज 41 नगरसेवकांपैकी हा दारूडा नगरसेवक असेल तर अजितदादांनी यास कशी संमती दिली. या दारूड्या नगरसेवकाबरोबर प्रभागात असणाऱ्या महिलेला अडचणीचे ठरणार नाही ना असेही नागरिकांत बोलले जात आहे.
कधीही पाहिले तर हा दारूडा “किमा”न नगरसेवक सतत मद्यधुंद असतो सन 2025 च्या कौन्सिलमध्ये हा दारूडा बसणार, उठणार, ठरावास मंजूरी देणार हे ना.अजित पवार यांना आवडणार का? या होणाऱ्या नगरसेवकाने दारू तरी सोडावी अन्यथा प्रभागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व विशेषतः ना.अजित पवार यांची बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही.