लाख मेले तरी चालतील लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असे प्रभाग क्र.17 चे उमेदवार आलताफ सय्यद यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात

बारामती(प्रतिनिधी)ः समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारा अवलिया म्हणून आलताफ सय्यद यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे लाख मेले तरी चालतील लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असे त्यांच्या प्रचारा दरम्यान मतदारांमधून एकच सुर ऐकू येत होता.

प्रभाग क्र.17 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आलताफ हैदर सय्यद यांच्या प्रचाराचा शुभारंभ हिंदू-मुस्लीमांचे ग्रामदैवत ह.चाँदशाहवली बाबांना चादर व नारळ वाहून करण्यात आला. यावेळी बहुसंख्य मुस्लीम समाज व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वतःसाठी तर सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगणारे खुपच कमी व्यक्ती या जगात आहेत. स्वकर्तृत्वाने अशा व्यक्तीचा सुगंध चंदनाप्रमाणे सर्वत्र दरवळत असतो. स्वतःसाठी जगला तो मेला दुसऱ्यासाठी जगला तो जगला या उक्तीप्रमाणे जगणारे, समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारे अवलिया आलताफ सय्यद आहेत असे आसिफ झारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीत पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मुलाखतीत आलताफचे काम मला माहिती आहे एवढे विश्वासाने बोलले. अशा गाढा विश्वास आलताफ सय्यद यांचेवर राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा आहे. त्यांनी कधीही चुकीचे काम केले नाही व करणार नाही. समाजात एखादा व्यक्ती मोठा होत असेल तर नक्कीच त्याचे पाय ओढणारे असतात हे काय नविन नाही असे इम्तियाज तांबोळी यांनी यावेळी सांगितले.

आलताफ सय्यद यांनी केलेले सामाजिक, राजकीय कामामुळे त्यांना नगरपरिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. निसंकोच ते भरघोस मताने निवडून येतील यात शंका नाही असेही उपस्थितांनी बोलताना व्यक्त केले. आलताफ सय्यद यांनी मोठ-मोठी संकेट पार केलेली आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाची धुरा ते येणाऱ्या काळात सक्षमपणे सांभाळतील व समाजाचा आणखीन उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत असेही यावेळी रशिद बागवान यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!