बारामतीः बारामती नगरपरिषद निवडणूकीत इच्छुक उमेदवारांनी माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांची मुलाखत घेऊन पाच वर्षाचा त्यांचा अनुभव घ्यावा आणि पाच वर्षात त्यांना जास्तीचा त्रास देणारे व गट-तट निर्माण करणारे कोण होते याचा उलघडा झाल्याशिवाय राहणार नाही. बारामती नगरपरिषदेचा अनुभव असणाऱ्या महिलेला यांच्याकडून त्रास होत असेल तर नवखे इच्छुकांचे काय होईल याचा विचार करण्याची गरज आहे.
14 डिसेंबर 2016 रोजी बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणूकीत एकुण 19 प्रभाग होते. 1 ते 18 प्रभागातून दोन नगरसेवक तर नगराध्यक्ष एक अशी तीन मते मतदारांनी द्यावयाची होती. तर प्रभाग क्र.19 मध्ये एक नगराध्यक्ष व तीन नगरसेवक अशी मिळून चार मते मतदारांनी द्यावयाची होती. अशा निवडणूकीत सौ.पौर्णिमा तावरे बहुसंख्य मताधिक्याने निवडून आल्या.
अजितदादा पवार यांच्या आग्रहास्तव सौ.पौर्णिमा तावरे यांनी नगराध्यक्ष पदावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या पदामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रत्येक अडचणीच्या, अंदोलना वेळी रात्री-अपरात्री महिला असताना सुद्धा त्या हजेरी लावत होत्या. नुकताच महिला धोरण-2014 लागू झाला होता. पवार साहेबांच्या प्रयत्नातून राजकीय क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. एक महिला नगराध्यक्ष झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत एक वेगळा संदेश सर्वत्र गेला.
तावरे परिवाराचे पवार कुटुंबाशी असलेली निष्ठा, नेत्यांशी एकनिष्ठता, सामाजिक राजकीय कामाचा अनुभव, उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव एवढे सर्व असताना सुद्धा त्यांना काही लोकांचा त्रास सहन करावा लागला. ते करीत असलेल्या कामात अडथळा, त्यांच्या निर्णयाला विरोध करणे,दादांनी नगरपरिषदे मधील सर्वसाधारण सभे आदी बैठक घेऊन सुद्धा सभे मध्ये पक्षाचेच काही जण तिथे वेगळी भूमिका मांडत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असताना सुद्धा गट-तटाचा फटका त्यांना सहन करावा लागला. यांच्या गटात जर नगरसेवक गेला तरच त्यांची कामे होत होती असे चित्र सर्वांनी पाहिले आहे.
बारामती नगरपरिषदेत नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असते, मात्र नगराध्यक्षांपासून काही नगरसेवकांना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते हे ही पाहणे गरजेचे आहे. पक्षाच्या नेत्यांनी राज्याचे काम पहायचे का बारामती शहराचे असाही प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यापर्यंत नगरपरिषदेत होणाऱ्या प्रत्यक्ष घडामोडी पोहचत नाही, जरी पोहचल्या तर ते भ्रशब्द बोलत नसतील तर नगराध्यक्ष पद काय कामाचे असेही माजी नगरसेवक व नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
या निवडणूकीत पुन्हा त्रास देणारे, गट-तट निर्माण करून नगराध्यक्षांना वेठीस धरणाऱ्यांना संधी मिळणार, पुन्हा तेच ते पाढे पच्चावन्न अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. घरचं खायचं, आर्थिक झळ सोसायची, नेत्यांशी एकनिष्ठ रहायचे आणि गट-तट निर्माण करण्याची बोलणी खायची हे कोणाच्या बां ने सांगितले आहे.