काल दिवसभरात 35 रुग्ण कोरोना बाधित

बारामती(वार्ताहर): दि. 29 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 15 तर ग्रामीण भागातून 20 रुग्ण असे मिळून 35 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल 178 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 22 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. 55 रुग्णांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. इतर तालुक्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. 88 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 13 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 35 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 209 रुग्ण असून, बरे झालेले 2 हजार 408 आहे तर मृत्यू झालेले एकोणएैंशी आहेत.

“काल माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत निंबुत,होळ व सांगवी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 157 एंटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये होळ येथे 06, नींबुत येथे 05 व सांगवी येथे 16 असे एकूण 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 3209 + 27 = 3236 झालेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!