मुलांचे शारीरिक,मानसिक आणि भावनिक विकासाचे निरीक्षण करणारे डॉ.सौरभ मुथा यांचा विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवस साजरा

बारामतीः नवजात बाळ, लहान मुले व किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाचे निरीक्षण करून अडचणी ओळखणारे बारामतीचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.सौरभ मुथा यांचा वाढदिवस विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात विधायक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

प्रथमतः डॉ.सौरभ मुथा यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी डॉ.सौरभ यांना ज्यांनी घडविले ते त्यांचे माता-पिता डॉ.राजेंद्र मुथा, माजी नगराध्यक्षा सौ.भारती मुथा व मुथा परिवार उपस्थित होते. विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष हनुमंत उर्फ चिऊशेठ जंजीरे, पवनराजे बनसोडे, नेताजी बुरूंगले, कार्याध्यक्ष नरेंद्र मिसाळ, विठ्ठल आगवणे, अजय कदम व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत चव्हाण उपस्थित होते. यावेळी श्रीपाल हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांना विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त सोलापूर चादरी भेट देण्यात आल्या. आयोजित केलेला वाढदिवस पाहुन संपूर्ण मुथा कुटुंब भावुक झाले होते. अशाप्रकारे प्रेम करणारे बोटावर मोजता येतील अशीच लोकं असतात अशी भावनिक प्रतिक्रीया मुथा परिवाराने यावेळी व्यक्त केली.

नवजात बाळ आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब भावनिक झालेले असते. थंडी, ताप किंवा तापात झटका आल्यावर कुटुंबातील व्यक्तींची परिस्थिती बिकट झालेली असते. अशात डॉ.सौरभ मुथा त्यांच्या भावनांचा अंत न पाहता त्यांना प्रथमतः धीर देण्याचे काम करतात. डॉ.सौरभ मुथा यांनी कित्येक लहान मुलांचे किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केली. कित्येक नवजात बाळांचे प्राण वाचविले. लहान मुले खरं तर देशाचे भविष्य आहे. लहान मुले देवाघरची फुले असतात हे समजून डॉ.सौरभ मुथा लहान मुलांचा उपचार करतात तोही यशस्वी. त्यामुळे कमी कालावधीत नावलौकीक मिळविलेले डॉ.सौरभ मुथा आहेत.

बारामतीत काय नव्हते त्यावेळी लहान मुलांचे हॉस्पीटल म्हटलं की, मुथा हॉस्पीटल म्हणून प्रसिद्ध होते. बारामती बँकेचे माजी संचालक डॉ.राजेंद्र मुथा यांनी बहुसंख्य मुलांचे उपचार करून कुटुंबांना धीर दिला. डॉ.मुथांचा हात लागला तरी मुल हसते अशी धारणा बारामतीकरांची झाली होती. मुथा हॉस्पीटल फक्त बारामतीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून उपचारासाठी लहान मुले येतात आणि योग्य उपचार घेऊन जातात व समाधान व्यक्त करतात.

डॉ.सौरभ मुथा यांना लहानपणांपासूनच मिळालेले बाळकडू ते प्रत्यक्षात आज सर्वांसाठी बालरोगतज्ञाच्या माध्यमातून मिळाले आहे. शांत, संयमी, मनमिळावू स्वभावाचे डॉ.सौरभ मुथा आहेत. अशा नामवंत, किर्तीवंत डॉ.सौरभ मुथा यांना विष्णूपंत यांनी हेरून त्यांचा वाढदिवस साजरा केला हे खुप महत्वाचे आहे. सर्वस्तरातून डॉ.सौरभ मुथा यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला व होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!