बारामतीः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पोलीसांकडून बंद न होणारा मटका अड्डा ना.नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकून पोलीसांचा कारभार समोर आणला आणि पाहता..पाहता कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आले. पोलीस खात्यात या ठोस कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.गिल यांच्याकडून खुप अपेक्षा वाढलेल्या आहेत. बारामती शहर व तालुका राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. ज्याप्रमाणे बारामतीचा विकास ना.अजित पवार यांनी केला. या विकासाला अवैध धंद्यांची किड लागलेली आहे. ही किड दूर करण्यासाठी ना.अजित पवार कोणते पाऊल उचलणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागलेले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा प्रशासनावरील विशेषतः पोलीसांवरील धाक कमी झालेला दिसत आहे. कोणतेही काम असो ना.पवार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून ते काम तडीस नेतात मग, पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणेबाबत ना.अजित पवार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांना कोणतेही आदेश देत नाही त्यामुळे पोलीसांवर असणारी पकड कमी झाली का? असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
पुणे जिल्ह्यासाठी नव्याने येणारे पोलीस अधिक्षक बेकायदेशीर धंदे बंद करणेबाबत फक्त आश्वासन देत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. मात्र, कृती शून्य असते. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व शहरातील गाव, वाडी वस्त्यांमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. सध्याचे सतर्क असणारे पोलीस अधिक्षक श्री.गिल साहेब संबंधित पोलीस स्टेशन व ठाण्यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कोणती कारवाई करणार आणि कारवाई करूनही धंदे पुन्हा त्याचठिकाणी मिश्यावर ताव मारीत धंदे सुरू ठेवतात. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तथा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कोणता कारवाईचा बडगा उगारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.