राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख एमआयएम पक्षाच्या वाटेवर : स्थानिक स्वराज्य निवडणूकीत मोठी खेळी – जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांनी नुकताच एमआयएम पक्षाच्या वाटेवर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाची मोठी खेळी असल्याचे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी केले.

विविध समस्या आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा औरंगाबाद येथील पक्ष कार्यालय दारुसलाम येथे झाली. यावेळी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, प्रदेश सहसचिव शफीउल्लाह काझी उपस्थित होते.

यावेळी डॉ.परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्त्यांसोबत एमआयएम मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली.

पुढे डॉ.अशरफी म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये धर्म प्रसारण बाजूला ठेऊन राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोक प्रतिनिधी करत आहे. यांना कोणीही जाब विचारायला तयार नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न करत आहे. मुस्लिम समाजाचे दर्गा मशीद मदरसावर हल्ले होत आहे. काही जातीवादी संघटन लोकांना आव्हान करत आहे. प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही.

न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रशासन कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही. दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही. तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीलाच दम देऊन हाकलून देतात. असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि विधानसभेत मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी खुलेआम प्रचार केला, त्याचे आज आवाज बसले आहे. दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे. अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही. मागास्वर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊ पर्यंत मारतात असेही ते म्हणाले. गो-रक्षकांच्या नावाखाली हल्ले करतात, जनावरे चोरून दुसरीकडे विकतात असे अनेक समस्यांच्या चर्चा यावेळी करण्यात आली.

इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले.आणि आपल्या सारखे ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगर पालिकेत पक्षाची महत्त्वाची भूमिका राहील असे सांगितले.

समद खान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्याक समाजावर खालची पातळीवर टीका होत असताना एम आय एम व्यतिरिक्त कोण्ही बोलायला तयार नाही. जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहुन काय करू. म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे.

एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगर मध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, नगरसेवक समद खान, अंजर खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, यूथ अध्यक्ष अमीर खान, आवेज काझी,जावेद शेख,नवीद शेख सनाउल्लाह खान, समीर खान, वाहिद हुंडेकरी, सज्जाद शेख, अजीम राजे, मोसिन शेख, मतीन खान आदी उपस्थिती होते.

येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!