होम मिनिस्टर कार्यक्रमाला सिनेअभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर तर स्टार टीव्ही बालगायिका सह्याद्री मळेगांवकर येणार : प्रथक बक्षिस फ्रीज व पैठणी

बारामतीः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या अंगी असणाऱ्या कला,गुणांना वाव देण्यासाठी महिला सक्षमीकरण व सबलीकरण व्हाव्यात या हेतूने न्यू होम मिनिस्टर-2025 चे आयोजन रविवार दि.24 ऑगस्ट 2025 रोजी दु.3 वा. श्री संत सावतामाळी चौक, ढवाणशाळेसमोर, नवीन रिंग रोड, मोरगाव रोड बारामती याठिकाणी केले असल्याचे आयोजक सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज कमरूद्दीन सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या न्यू होम मिनिस्टर-2025 चे सादरकर्ते सिनेअभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर व स्टार टीव्ही बालगायिका सह्याद्री मळेगांवकर हे असुन, प्रत्येक सहभागी महिलेस हमखास भेटवस्तु मिळणार आहे.

या न्यू होम मिनिस्टर-2025 चे मार्गदर्शक बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव हे आहेत. या न्यू होम मिनिस्टर-2025 होणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्यास फ्रीज व पैठणी, द्वितीय एलईडी टीव्ही, तृतीय ओव्हन, चतुर्थ मिक्सर तर पाचवे बक्षिस डिनरसेठ तर सहभागी महिलेस भेटवस्तु देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमा दरम्यान लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे ज्या महिलेचे नाव लकी ड्रॉमध्ये येईल तीस वॉटर प्युरिफायर बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणाऱ्या कला, गुण सादर करावेत असेही परवेज सय्यद यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमास परवेज सय्यद यांच्यासह सहप्रायोजक म्हणून सहारा फौंडेशन बारामती, एकता इंग्लिश मिडीयम स्कूल मोरगाव रोड बारामती, साई राज डेव्हलपर्स बारामती, युनिटी हेल्थ क्लब बारमाती, युनिटी मोटर्स बारामती व अलअजिम परफ्युम्स्‌‍ हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!