27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व खा.सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते बारामती गणेश फेस्टिवलचे उद्घाटन होणार: सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

बारामतीः बारामतीत गणेश फेस्टिवल म्हटले की, नटराज नाट्य कला मंडळातर्फे राबविण्यात येणारा अत्यंत लोकप्रिय आणि उत्साहात साजरा होणारा बारामती गणेश फेस्टिवल आहे. गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने पूजा-अर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि अखेरीस विसर्जन मिरवणुक पाहण्यासारखी असते.

या बारामती गणेश फेस्टिवलचे उद्घाटन बुधवार दि.27 ऑगस्ट 2025 रोजी सायं.6.30 वा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व राज्यसभेच्या खासदार सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी सांगितले आहे. दरम्यान सकाळी 10 वा. श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

बुधवार दि.27 ऑगस्ट 2025 रोजी नृत्य-गीत नाटीका सप्तरंगधनु
गुरूवार दि.28 ऑगस्ट 2025 रोजी ह.भ.प.निवृत्तीमहाराज देशमुख (इंदुरीकर) किर्तन
शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी झी पुरस्कार, मटा सन्मान, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त विनोदी नाटक आमने सामने
शनिवार दि.20 ऑगस्ट 2025 रोजी दु.4 ते 6 वा. महिलांसाठी स्वतंत्र शो तर सायं.7 वा सर्वांसाठी मराठी लावणी नृत्य कार्यक्रम रूपानं देखनी
रविवार दि.21 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी गीतांचा कार्यक्रम टोटल म्युझिक धमाका ऑक्रेस्ट्रॉ
सोमवार दि.01 सप्टेंबर 2025 रोजी सुपरहिट गाण्यांची मैफिल बॉलिवूड आयकॉन्स ऑक्रेस्ट्रॉ
मंगळवार दि.02 सप्टेंबर 2025 रोजी हिंदी गीतांचा कार्यक्रम दि ग्रेट गुलजार
बुधवार दि.03 सप्टेंबर 2025 रोजी मराठी गाण्यांचा महाराष्ट्रातील एक दर्जेदार वाद्यवृंद..स्वर आले जुळुनी…
गुरूवार दि.04 सप्टेंबर 2025 रोजी मराठी लावणी नृत्य कार्यक्रम तुमच्यासाठी कायपण
शुक्रवार दि.05 सप्टेंबर 2025 रोजी दु.4 ते 6 वा. महिलांसाठी खेळ पैठणीचा व कऱ्हेचे कलावंत
शनिवार दि.06 सप्टेंबर 2025 रोजी बारामती गणेश फेस्टिवलचे नेत्रदिपक पारंपारीक मिरवणूक विसर्जन मिरवणुक

सदरचे कार्यक्रम नटराज नाट्य कला मंदीर, बारामती येथे सायं.7 वा. सुरू होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!