बारामती (प्रतिनिधी) – संपूर्ण भारतवर्षात जिथे स्वातंत्र्याच्या ७९ व्या गौरवशाली वर्षांचा उत्सव साजरा केला. तिथे संत निरंकारी मिशनने आत्मिक स्वातंत्र्याच्या रूपात श्रद्धा आणि समर्पणाने युक्त अशा मुक्ती पर्व दिवसाचे आयोजन केले. हे पर्व केवळ एक स्मरण नाही, तर आत्मिक चेतनेची जागृती आणि जीवनाचा परम उद्देश याचे प्रतीक आहे.
मुक्ती पर्व दिवसाचा मुख्य संत समागम अध्यक्षतेखाली दिल्लीतील निरंकारी ग्राउंड क्र.८. बुराडी रोड येथे आयोजित करण्यात आला. तर विश्वभरातील मिशनच्या सर्व शाखांमध्येही मुक्ती पर्वाच्या निमित्ताने विशेष सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करत मिशनमध्ये होऊन गेलेल्या महान संतांना अभिवादन करण्यात आले. त्या अनुषंगाने बारामती इंदापूर, फलटण, तालुक्याच्या वतीने अंथूर्णे येथील सत्संग भवनात हा मुक्तीपर्व दिवस साजरा करण्यात आला.
त्यामध्ये शहनशाह बाबा अवतारसिंहजी, जगत माता निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन बुद्धवंतीजी, राजमाता कुलवंत कौरजी, माता सविंदर हरदेवजी, भाईसाहेब प्रधान लाभ सिंहजी, ब्रह्मर्षि ऋषि व्यासदेवजी, ब्रह्मर्षि ऋषि कमलजी, गुरबख्श सिंह ‘राजकवी’जी व इतर अनेक समर्पित संतांचे हृदयपूर्वक स्मरण करुन त्यांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यात आले.
आध्यात्मिकतेच्या पवित्र वातावरणात समस्त भक्तगणांना संबोधित करताना निरंकारी राजपिताजी म्हणाले, की संपूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे. त्याच वेळी संतजन याला मुक्ती पर्वाच्या माध्यमातून आत्मचेतना आणि भक्तीचा संदेश देऊन साजरा करत आहेत. जसे तिरंगा झेंडा आणि देशभक्तीपर गीतं स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत तसेच एका भक्ताचे जीवन सेवा, समर्पण आणि भक्तीच्या सुगंधाने भरलेले असते. सतगुरूंनी दिलेल्या बहाज्ञानात खरे स्वातंत्र्य आहे जे आपल्याला मीपणा आणि अहंकारापासून मुक्त करते. मुक्ती पर्वाची मूळ भावना ही आहे, की जसे भौतिक स्वातंत्र्यता आपल्याला राष्ट्राच्या उन्नतीचा मार्ग दाखवते, तसेच आत्मिक स्वातंत्र्यता अर्थात जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्तता ही मानवी जीवनाची परम उपलब्धी आहे. ही मुक्ती केवळ ब्रहाज्ञानाच्या दिव्य ज्योती मुळेच शक्य आहे जी आम्हाला परमात्म्याशी जोडते.