बारामती(वार्ताहर): दि. 28 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 22 तर ग्रामीण भागातून 27 रुग्ण असे मिळून 49 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 201 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 33 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. प्रतिक्षेत एकही रुग्ण नाही. इतर तालुक्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. 87 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 16 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 49 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 174 रुग्ण असून, बरे झालेले 2 हजार 331 आहे तर मृत्यू झालेले अष्ट्याहत्तर आहेत.
बारामती व शहरात कमी होत असलेले रुग्ण म्हणजे एक दिलासादायक बातमी आहे. नागरीक शासनाने घालुन दिलेले नियमांचे तंतोतंत पालन करीत आहेत. प्रशासन सुद्धा तेवढेच सतर्कतेने काम करीत आहे. रुग्ण कमी होण्यासाठी प्रशासनाचा खुप मोठा वाटा आहे. ज्या-त्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्तकता दाखवुन काम करीत आहे. त्यामुळे हे यश मिळत असल्याचे नाकरता येत नाही. विशेष म्हणजे माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यासाठी सर्व स्तरातील मंडळींनी केलेले सहकार्य, प्रशासनाची तळमळ कामी आली आहे.