शिरूर पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे 3 गावठी पिस्टल व 1 कट्‌ट्यासह 4 आरोपी जेरबंद!

शिरूर(वार्ताहर): 3 गावठी पिस्टल व एक गावठी कट्‌ट्यासह 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेवर भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यास शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, सहा.पोलीस निरीक्षक अर्जुन मोहीते, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो.ना.कुडेकर व पो.कॉ. जारवाल यांना यश आले आहे.

यामध्ये किरण हरीभाऊ सोनवणे (वय-25वर्ष ), सुनिल रामदास सोनवणे (वय-19वर्ष), संतोष गोरख मंडले(वय-22 वर्ष) सर्व रा.पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर व कांतीलाल उर्फ हर्षराज रामदास शिंदे वय 26 रा.बाबुळसर खुर्द ता.शिरूर जि.पुणे या आरोपींचा समावेश आहे. सदर आरोपींना 5 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी सांगितली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 27 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सी.टी. बोरा कॉलेज शिरूरजवळ पुणे-अहमदनगर रोडवरील पुलाखाली 4 इसम थांबले असुन त्यांचे जवळ गावठी पिस्टल असण्याची शक्यता आहे व त्यांचेजवळ विना नंबरप्लेटची ऍक्टिवा गाडी आहे. याबाबत सदरची बातमी पोलीस निरीक्षक श्री.खानापुरे यांना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दक्षता दाखवीत त्यांच्या मदतीसाठभ पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी व कर्मचारी घेऊन घटनास्थळी गेले.

पुणे-अहमदनगर रोडवरील पुलाजवळ जात असताना उडाण पुलापासुन 50 मीटर अंतरावर असताना शासकीय वाहनाचे उजेडामध्ये उड्डाणपुलाखाली चार इसम उभे असलेले दिसले त्यांनी सरकारी वाहनास पाहताच ते दचकुन पळण्याचा प्रयत्न करू लागले असता त्यांना पोलीस कर्मचार्‍यांनी पाठलाग करून पकडले.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी दौड विभाग गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पो.ना. मुकुंद कुडेकर,पो.कॉ.करणसिंग जारवाल व दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी मिळुन केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!