भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): पावसामुळे व राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या कामकाजामुळे या बसस्थानकात दरवेळेस पावसाचे पाणी शिरते, व मोठ्या गैरसोयींचा त्रास इथे येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो. हजारो प्रवासी या ठिकाणी रोज येतात, परंतु पावसाळ्यात त्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. या त्रासातून भिगवणकर व प्रवाशांची सुटका करावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघ यांनी केली.
या सर्व तक्रारींची व गैरसोयींची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लागलीच दखल घेतली. महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून, नव्या प्रशस्त भिगवण बसस्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या भेटीप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सत्कार भिगवण गावचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजिंक्य माडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघ, ओंकार गाढवे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.