महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर!

बारामती(प्रतिनिधी)ः “डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात मार्गदर्शक सूचना“ दि.3 जून 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या असून त्या शासन निर्णय प्रसिद्ध झालेपासून अमलात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून माहितीच्या प्रसारात डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, शासनाकडे डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती मिळाव्यात, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक मावज-2025/251/प्र.क्र. 132/मावज 1 द्वारे हा निर्णय घोषित केला.

शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या मार्गदर्शक सूचनांचा लाभ सर्व विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कंपन्यांना होणार असून, ते आता डिजिटल माध्यमांना अधिकृतरित्या शासकीय जाहिराती देऊ शकतात. या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांना आर्थिक स्थैर्य मिळेल,शासनाच्या योजना आणि धोरणांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल,माहितीचा लोकांपर्यंत जलद आणि पारदर्शक पोहोच होईल.

हा आदेश अवर सचिव अ. धों. भोसले यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!