दहावीत पायल चिंचोळे व पूनम लव्हे प्रथम: श्री सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 95 टक्के निकाल

भिगवण(प्रतिनिधी-योगेश गायकवाड: सन 1994 मध्ये स्थापन झालेल्या श्री सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव गाडा(ता.दौंड, जि.पुणे) चा दहावी परीक्षेचा 95 टक्के निकाल लागला असून, कु.पायल मल्लिकार्जुन चिंचोळे व कु.पूनम आप्पासाहेब लव्हे या विद्यार्थिनींना 94.80 टक्के समान गुण मिळाले असून, विद्यालयात दोघींनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या विद्यालयातून दहावी परीक्षेसाठी 72 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता. त्यापैकी 68 विद्यार्थी पास झाले आहेत. कु.श्रुती महादेव कुदळे हीस 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कु.अनुष्का अशोक शितोळे हीस 92.60 टक्के मिळाले असून तृतीय क्रमांक तर प्रणव दत्तात्रय बारवकर यास चौथा नंबर मिळालेला आहे.

या यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!