बारामती(प्रतिनिधी)ः गेली 18 वर्ष अखंडित बारामती शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील मुस्लीम बांधवांना शिर्रर्खुमा बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचे मोफत वाटप करीत आले आहे. यंदाचे 19 वे वर्ष असून आज 29 मार्च रोजी सायं.4 वा. राष्ट्रवादी भवन, कसबा बारामती याठिकाणी 300 कुटुंबियांना या पदार्थांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजक मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या कार्यक्रमाचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आ.इद्रीस नाईकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुऱ्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तसेच बारामती दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, शहराध्यक्ष जय पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, बानप शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद, बारामती बँकेचे संचालक गिरिष कुलकर्णी इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास आग्रहास्तव उपस्थित रहावे असेही आवाहन आलताफ सय्यद व एकता ग्रुपने केले आहे.