तलवार घेऊन म्हणेल भाई, तो गजाआड जाई: भिगवण पोलीसांची कामगिरी!

भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या व आम्ही भाई आहोत असे म्हणून धमकी शिवीगाळ करणाऱ्यांना भिगवण पोलीसांनी गजाआड केल्याने, पोलीसांच्या कामगिरीवर नागरिकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 14 मार्चला सायं. सव्वासहाच्या दरम्यान शेटफळगढे (ता.इंदापूर) हद्दीत बारामती अँग्रो शुगर फॅक्टरी हमाल चाळ समोर बंटी उर्फ विक्रम मधुकर मचाले (रा.शेटफळगढे,ता.इंदापुर) व त्याचे साथीदार यांचेसह हातात तलवार घेवुन भाऊ वैभव मचाले याचेबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, सुनिल रॉय याला हाताने मारहाण केली तसेच हातात तलवार घेवुन त्याचे साथीदार यांनी, मोठमोठयाने आरडा ओरडा करून शिवीगाळ करून आम्ही या ठिकाणचे भाई आहोत आम्हाला कोण आडवितो ते बघु असे म्हणुन कामगारांचे दारावर दगडी मारत त्या ठिकाणी दहशत माजविली.

सदरची घटना घडल्यामुळे कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. विनोद महांगडे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे यांना मार्गदर्शन करून आरोपी तात्काळ अटक करणेबाबत सुचना दिल्या.

सदर गुन्हयातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याने त्यांचे फोन बंद करून तो पसार झाला होता. या आरोपींबाबत गोपनिय बातमीदार यांचे मदतीने माहीती काढुन त्यास 21 मार्च रोजी ताब्यात घेवुन अटक केली.

आरोपी नामे बंटी उर्फ विक्रम मधुकर मचाले (रा. शेटफळगळे, ता. इंदापुर) यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, इंदापुर न्यायालयाचे समक्ष हजर केले असता, मे.कोर्टाने आरोपीची 25 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले होते. सदर गुन्हयाचा पुढील तपास महेश उगले करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देखमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विनोद महागडे, पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे, रामदास कर्चे, अनिकेत शेळके यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!