बारामती(प्रतिनिधी): येथील समाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेर-ए-म्हैसुर यंग सर्कल व मुस्लीम समाज बारामती यांच्या वतीने मंगळवार दि. 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.30 वा महात्मा गांधी चौक, बागवानगल्ली, बारामती याठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याचे शोएबभाई बागवान मित्र परिवाराने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या कार्यक्रमास ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष ॲड.एस.एन.जगताप, शहराध्यक्ष ॲड संदीप गुजर, युवक शहराध्यक्ष सत्यव्रत काळे, माजी नगरसेवक हाजी अमजद बागवान, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आलताफ बागवान, यादगार सोशल फौंडेशनचे अध्यक्ष फिरोज बागवान व सामाजिक कार्यकर्ते शाकीर बागवान या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
पवित्र अशा रमजान महिन्यात मुस्लिम समाज बांधव दिवसभर अन्न पाण्याविना उपवास (रोजा) करतात. हा उपवास (रोजा) सोडण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक स्तंभ म्हणजे रोजा आणि, मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे रमजान. या महिन्यात उपवास, सत्कर्म आणि अल्लाहची उपासना, या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.
अशा कार्यक्रमामुळे देशात धार्मिक व सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राहिल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे शोएब बागवान यांनी सांगितले.