बारामती(प्रतिनिधी): भोरचा विक्रम गायकवाड या तरूण बौध्द युवकांचा आंतरजातीय विवाह केल्यामुळे खुन झाल्याचे प्रकरण ताजे असताना माळेगाव (ता.बारामती) येथील लक्ष्मण भोसले या उच्चशिक्षित बौद्ध युवकाला आंतरजातीय विवाह केला म्हणून याचे अपहरण करून मारहाण केली शस प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अनुसूचित जाती जमात आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी आरोपी नामे शाखा करचे, निखिल खरात, पृथ्वीराज करचे, गौरव होळकर इतरांवर गुन्हा तात्काळ दाखल करून संबधीत आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे ॲड.अक्षय गायकवाड यांनी प्रकरणाचे गांर्भीर्य ओळखत अनुसुचित जाती जमातीच्या आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली. लक्ष्मण राजेंद्र भोसले या तरुण उच्चशिक्षित बौध्द युवकाला आंतरजातीय विवाह केला म्हणून नातेपुते माळशिरस या परिसरातील काही मनुवादी गावगुंडांनी नवविवाहित दाम्पत्याला बळजबरीने अपहरण करून जबरी मारहाण करून भोसले यांना जीव मारणाचा प्रयत्न केला व नवविवाहित लक्ष्मण भोसले यांच्या पत्नीला जबरदस्तीने त्यांचा पासून वेगळे करून घेऊन गेले. या मारहाणीच्या व जातीदोषातून दिलेल्या वागणीबदल याबाबत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती व सासवड यांच्याकडे अनेकदा दाद मागितल्या नंतरही दाद दिली नाही.
त्यामुळे आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी पुणे जिल्हयाचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत दि.1 मार्च 2025 रोजी गु.र.नं.0083 दाखल भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023, 140(2), 115(2), 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989, 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) तसेच 3(2) (पाच) गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास सासवड येथील उपविभागीय अधिकारी हे करत आहे.
लक्ष्मण व तिची पत्नी 2021 पासून कॉलजे मध्ये शिकत होतो त्याना नंतर त्यांची मैत्री होऊन प्रेम झाले. त्यानंतर 28 डिसेंबर 2024 या दोघा उभयतांनी आळंदी येथे जाऊन लग्न केले. लग्न करून घरी येत असताना त्याचे अपहरण करून बेदम मारहाण केली.त्यानंतर लक्ष्मण यांचा डोक्याला बंदुक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व बाबींची दखल घेत धर्मपाल मेश्राम साहेबांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत सरकारच्या आदेशानुसार आंतरजातीय विवाह केलेला दाम्पत्याला पोलीस संरक्षण तत्काळ द्यावे असे आदेश सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
ॲड.अक्षय गायकवाड यांच्या तत्परतेने व आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या आदेशाने पिडीत लक्ष्मण व तिच्या पत्नीस न्याय व आधार मिळाला.