बालगृहातील मुलाचा बुडून मृत्यू: अधिक्षक रॉबर्ट गायकवाड यांची माहिती

बारामती(प्रतिनिधी): येथील चर्चेस ऑफ ख्राईस्ट बॉईज होम बारामती येथील बालगृहातील मुलगा राजवीर वीरधवल शिंदे (वय-15 वर्षे) यास पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असल्याची खबर बारामती शहर पोलीस स्टेशनला संस्थेचे अधिक्षक रॉबर्ट वसंत गायकवाड यांनी 18 फेब्रुवारी 2025 दिली आहे.

त्यांनी दिलेल्या खबर मध्ये सांगितले की, सन 2018 पासून राजवीर शिंदे बालगृहात दाखल झाला आहे. तो आणि त्याचे दोन मित्र अर्जुन वाघारी व मोईन अमीर शेख असे मिळून बालगृहामधून कोणाला काही न सांगता सांय. 4.30 वा. नटराज पार्क येथे फिरायला गेली त्यानंतर ते कॅनॉलमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरले असता राजवीर यास पोहता येत नसल्याने तो पाण्यामध्ये बुडून वाहून गेला आहे.

18 फेब्रवारी पासून सदर मुलाचा कॅनॉलमध्ये शोध घेतला असता आज रोजी त्याचे प्रेत बांदलवाडी या ठिकाणी कॅनॉलचे पाण्यात मिळून आले आहे. बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंतराव गायकवाड यांचे खबरी जबाबावरून अकस्मात मयत दाखल करून अधिक चौकशी करीत असल्याचे बारामती शहर पोलीसांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!