बारामतीः राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सहकार्याने इतर तालुक्यांपेक्षा बारामतीसाठी पुन्हा एकदा जास्तीचा निधी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील 221 छोट्या व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून दिल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
बारामती शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजातील 221 छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी 3 लाख याप्रमाणे 6 कोटी 63 लाख रूपयांचा धनादेश वितरण कार्यक्रम राज्यसभा खासदार तथा तालिका सभापती खा.सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते रविवार दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. राष्ट्रवादी भवन कसबा बारामती याठिकाणी वितरीत करण्यात येणार असल्याचे मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या कार्यक्रमास मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुशताक अंतुले, कर्यकारी संचालक गफार मगदुम यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ही आलताफ सय्यद यांनी केले आहे.
आलताफ सय्यद यांच्या अथक प्रयत्नातून छोट्या व्यावसाय करणाऱ्यांना हा निधी प्राप्त होत आहे. यापुर्वी ही आलताफ सय्यद यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असे 15 कोटी पर्यंत निधी आणलेला आहे. या निधीत आणखीन 6 कोटी रूपयांची भर पडलेली आहे.