बारामत़ी(प्रतिनिधी): बारामती शहरातील लोहमार्गावर रेल्वे खाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही, आज दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बारामती शहरातून दौंड कडे निघालेला रेल्वे गाडीखाली महिला सापडल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदरची महिला अंदाजे 30 ते 35 वयोगटातील असावी, या महिलेची ओळख पटवण्याकरिता पोलीस तपास करीत आहेत. बारामती रेल्वे स्टेशन नजीक लोहमार्गावर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून ही आत्महत्या आहे की अपघात आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
रेल्वे येण्या जाण्याच्या वेळेत यापूर्वी सुद्धा अशा अनेक अपघात आणि घटना घडल्या असून या घटनांमध्ये काही जणांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पोलीस कसुन तपास करीत आहेत. रेल्वे लोहमार्गावर नजीकच्या काळात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. मयत महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांना तपासामध्ये वेग घेता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अपघाता दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी इथे दिसून आली.