वडगांव निंबाळकर(प्रतिनिधी): गेली 9 ते 10 महिने बंद पडलेल्या मुस्लीम दफनभूमी संरक्षण भिंतीचे काम सुरू न केल्यास अमरण उपोषण करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
बारामती तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वडगांव निंबाळकर गावातील मुस्लीम दफनभूमी संरक्षण भिंतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. सदर संरक्षण भिंतीचे काम दिमाखात सुरू झाले. कोणाची नजर लागावी असे गेली 9 ते 10 महिन्यांपासून काम थांबविण्याचे आदेश कोणाचे झाले, हे अद्याप तरी गुलदस्त्यातच असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले.
बंद पडलेले काम पुन्हा सुरू व्हावे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार व वंचित बहुजन आघाडी वडगांव निंबाळकर शाखेचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सदरील संरक्षण भिंतीचे काम तात्काळ सुरू न केल्यास समस्त वडगांव निंबाळकर मुस्लीम समाजाच्या वतीने 20 फेब्रुवारी 2025 रोजी उपविभागीय कार्यालय, प्रशासकीय भवन बारामती याठिकाणी अमरण उपोषण करण्यात येईल असेही राज कुमार व असिफ शेख यांनी इशारा दिला आहे.
सदरचे निवेदन देते समयी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार, वंचित बहुजन आघाडी बारामती तालुका अध्यक्ष आर्यन साळवे, वडगाव निंबाळकर शाखा अध्यक्ष आसिफ शेख, स्पर्धा परीक्षा मंच संस्थापक अध्यक्ष शरीफ शेख, शाहिद शेख, वैभव तावरे, आदित्य कदम, रविराज लगड, गणेश जाधव, शोएब शेख इ. समाज बांधव उपस्थित होते.