बारामती(प्रतिनिधी योगेश गायकवाड): विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पेन वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.

शाळेतील मुलांना माता रमाई यांनी केलेला त्याग, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी काय केले याचे स्मरण व्हावे या उद्देशाने मुलांना शालेय वस्तु पेन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सचिनभैय्या आढाव, वैभव आढाव, गोटू भोसले, उमेश आढाव, श्रीनिवास शेलार, अक्षय जोगदंड, कुणाल आढाव यांनी केले होते.