निष्ठा, त्याग व कष्टाने डॉ.बाबासाहेबांना मदत करणाऱ्या माता रमाई यांची जयंती साजरी

भिगवण(प्रतिनिधी योगेश गायकवाड): आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत करणाऱ्या माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नव बौद्ध युवक संघटना, तक्रारवाडी आंबेडकरनगर याठिकाणी रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सचिन आढाव, गोटू भोसले, योगेश गायकवाड, उमेश आढाव, वैभव आढाव, श्रीनिवास शेलार, अक्षय जोगदंड यांनी केले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईवर निस्सीम प्रेम होते. रमाईचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‌‘थॉट्स ऑन पाकिस्तान‌’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‌‘प्रिय रामू‌’ ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, “तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…” आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत. आजच्या दिनी करुणामूर्ती माता रमाईच्या 127 व्या जयंती निमीत्त उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी तक्रारीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा प्रशांत वाघ, उपसरपंच आशा जगताप, भिगवण पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री.जर्डे, माजी जि.प.सदस्या राणी आढाव, सीमा काळंगे, संगीता आढाव, माजी सरपंच सतीश वाघ, आण्णासाहेब आढाव, ग्रामपंचायत सदस्य नितीन काळंगे, सचिन वाघ, यशवंत वाघ, डॉक्टर बाळासाहेब भोसले. शामराव आढाव, हनुमंत आढाव, बलभीम आढाव, सचिनभैय्या आढाव, हेमंत भोसले, योगेश गायकवाड, जगन्नाथ जगताप, श्याम शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी तक्रारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!