बारामती नगरपरिषदेचा ठेका आहे एनडीके, हे तर दिवसाढवळ्या नागरिकांना ठोके: मुख्याधिकाऱ्यांची एनडीकेबाबत बघ्याची भूमिका, दुसऱ्या घटनेला मिळणार का बगल! एनडीकेला खतपाणी घालतय कोण?

बारामती(प्रतिनिधी): बारामती नगरपरिषदेचा ठेका आहे एनडीके, हे तर दिवसाढवळ्या नागरिकांना ठोके अशी अवस्था झालेली आहे. एनडीकेच्या कारभारावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांना नशा करून वाहनाने उडविण्याची दुसरी घटना घडलेली असताना सुद्धा यावर तरी कारवाई होईल का? अशी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

आज सकाळी साडे आठ ते साडे नऊ दरम्यान शाळेत मुलं सोडण्याची घाई सर्वांनाच असते. बारामती शहरात वाढलेली गर्दीमुळे मुलांना सायकलवर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करणे झालेले आहे. त्यामध्ये भिगवण चौकातील नव्यान केलेला रस्ता यामुळे कितीही चालक हुशार असला तरी कुठून वाहन येईल आणि ठोकून जाईल हेच कळत नाही.

अशा परिस्थितीत एक पालक योगेश नाळे आपले वाहन घेऊन मुलीला शाळेत सोडविण्यासाठी चालले असता, एनडीकेची कचरा संकलन वाहन व त्यावरील असणारा चालक बेधुंद नशा केलेला, वाहनावरील त्याचा ताबा सुटलेला अशात या पालकाला ओढत पतंजलि स्टोअर्स पासुन ते एमईसच्या गेटपर्यंत ओढत घेऊन गेला, यामध्ये मागे बसलेली मुलगी पडली मात्र, वाहन चालकाला काहीच कळत नव्हते त्याने योगेश नाळे यास फरफटत घेऊन गेला.

ही सर्व घटना रस्त्याने जा-ये करणाऱ्यांनी पाहुन सुन्न झाले. योगेश नाळे यांनी या घटनेबाबत मुख्याधिकारी यांना फोन केला असता, सदर ठिकाणी मुख्याधिकारी आले नाही असे योगेश नाळे यांनी यावेळी सांगितले.

या घटनेच्या बरोबर एक महिना पूर्वी 12 जानेवारी रोजी माजी उपनगराध्यक्ष सौ.ज्योती नवनाथ बल्लाळ यांना सुद्धा एनडीकेच्या कचरा संकलन वाहन व त्यावरील मद्यधुंद असणाऱ्या चालकाने वाहन मागे घेताना चक्क उपनगराध्यक्षा बरोबर इतर दोन महिलांना उडवले. यामध्ये किरकोळ जखमा झाल्या. चालकावर कारवाई करण्यात आली मात्र, एनडीकेचा ठेकेदार मोकळा राहिला. यावर माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी मुख्याधिकारी, पोलीस स्टेशन इ. ठिकाणी तक्रारी दाखल केल्या या तक्रारीमध्ये त्यांनी संबंधित ठेकेदारास सहआरोपी करण्यात येऊन नगरपरिषद व एनडीके यामध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे ठेका रद्द करण्यात यावा असेही लेखी स्वरूपात कळवूनही मुख्याधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

त्यामुळे ही योगेश नाळे यांचेबाबत झालेली दुसरी घटना आहे त्यामुळे आता जर कोणतीही कार्यवाही न झाल्यास बारामतीकर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असेही संतप्त नागरिकांनी यावेळी प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

सदर एनडीके ठेकेदाराबाबत सतत तक्रारी येत असताना सुद्धा सदरील ठेक्यावर मुख्याधिकारी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. यामुळे सदर ठेकेदारास पोसतय कोण? व खतपाणी घालतय कोण? हे पाहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!