बारामती(प्रतिनिधी): येथील कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम बारामती यांच्या वतीने रविवार दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय समोरील, बा.न.प. शाळा क्र.8 ग्राऊंड बारामती याठिकाणी सकाळी 11 ते सायं.5 वाजेपर्यंत भव्य-दिव्य ग्रेहाँड श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक विपुल काळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या शर्यतीचे उद्घाटन ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या शर्यतीत महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाबधमील ग्रेहाँड श्वानचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच बारामती डर्बी रेस-2025 सुद्धा होणार आहे.
या शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षिस माजी नगरसेवक सत्यव्रत उर्फ सोनू काळे यांचेकडून 31 हजार 1 असे देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय सतीश सोनवणे व सागर हिंगमिरे यांचेकडून 21 हजार 1, तृतीय संदीप भोई व संजय भंडलकर 11 हजार 1, चतुर्थ व पंचम क्रमांकाचे बक्षिस चारूदत्त काळे यांचेकडून अनुक्रमे 7 हजार 1 व 5 हजार 1 असे देण्यात येणार आहे. सहा ते दहा क्रमांकास प्रत्येकी 2 हजार 1 रूपये पै.विशाल काळे, 11 ते 15 क्रमांक प्रत्येकी एक हजार एक तर 16 ते 18 क्रमांक प्रत्येकी पै.विवेक काळे, इतर बक्षिसे पै.युवराज काळे यांचेकडून 5 हजार रूपये यासह 1 ते 20 क्रमांकांना स्व.अर्जुनराव(बाबा) काळे यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात येणार आहे.
या शर्यतीसाठी बारामतीतील विविध संस्थांवरील व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बारामती तालुक्यातील श्वानप्रेमींसाठी विविध जातीचे श्वान एकत्र पाहण्याची संधीही या शर्यतीच्या निमित्ताने मिळणार आहे. जास्तीत जास्त श्वानप्रेमींनी या शर्यतीला उपस्थित रहावे असेही आवाहन श्री.काळे यांनी केले आहे.