महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी सुभाषचंद्र बोस 1921 मध्ये इंग्लंड वरुन भारतात परत आले. बोस हे जवाहरलाल नेहरु यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले. हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता. 1938 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले, 1939 मध्ये पुन्हा निवडून आले पण पुढे त्यांच्यात आणि महात्मा गांधीमध्ये मतभेद झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले. कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रविंन्द्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधीजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे 20 जूलै 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. गांधीजींनी देखिल कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्यालाआले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये हया आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली आणि स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली. लवकरच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरुंसह सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. 1928 साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरुं ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरु रिपोर्ट सादर केला.
1928 साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरुंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधीजी त्याकाळी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरु ह्यांना पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देत एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, त्यामुळे 1930 साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की 26 जानेवारी हा दिवस ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून पाळला जाईल.
26 जानेवारी 1931 च्या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की ह्या बाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. 22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.
भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली, परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले. ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या 300 अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला, पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले. भारतातील अनेकांसाठी ते एक नायक आहेत. पण हुकूमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे, हे टीकेचे एक कारण होते. जर्मनीच्या सर्वात वाईट अतिरेकांवर आणि त्यांच्या अमानुष अत्यांचारावर जाहीरपणे टीका करण्याचे त्यांनी टाळले. तसेच पीडितांना भारतात आश्रय देण्याचीही अनिच्छा दर्शवली. पण हे सर्व जागरूकतेच्या अभावामुळे घडले असेही म्हणता येणार नाही. वयाच्या 15 व्या वर्षी सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.
सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक अग्रेसर नेते होते. नेताजी असे त्यांना प्रथम 1942 च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिनमधील भारताच्या विशेष ब्यूरोमधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरू केले होते. आता संपूर्ण भारतात त्यांना नेताजी म्हटले जाते. एडॉल्फ हिटलरने मे 1942 च्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली. बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले. त्यांची एका जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून ते मे 1943 मध्ये जपानच्या ताब्यातील सुमात्रा येथे उतरले. जपानच्या पाठिंब्याने बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली, ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय कैद्यांचा समावेश होता. जपान-व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि जपानने त्याचे प्रमुखपद बोस यांना दिले. जरी बोस असामान्य आणि प्रतिभाशाली होते, तरी जपानी लोक त्यांना लष्करीदृष्ट्या अकुशल मानत होते तसेच त्यांचा सैनिकी प्रयत्न अल्पकाळच टिकला. 1944 च्या उत्तरार्धात आणि 1945 च्या सुरुवातीस ब्रिटिश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला. यामध्ये जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि जपानसोबत सहभागी असलेल्या आझाद हिंद सेनेची तुकडी बळी गेली. यानंतर बोस हे सोव्हिएत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला गेले.
1925 साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. 5 नोव्हेंबर 1925 च्या दिवशी देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली. मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली, त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले. स्वातंत्र्य लढयातील धाडसी नेता सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
प्रविण बागडे, नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919