बारामती दि: १५, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, रोशीनी ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० जानेवारी या कालावधीत शारदानगर येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
हे संमेलन १२ वे असून, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. राजेंद्र पवार, विश्वस्त-सचिव, मा.सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलावडे, संस्था समन्वयक, श्री. प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर हेड मा. गार्गी मॅडम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत आहे.
महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवतींना स्वतःबद्दल विचार करायला लावून, स्वतःचा शोध घेण्याची संधी देवून, त्यांच्यातील ऊर्जा सकारात्मक नवोपक्रमांमध्ये नेवून, परिवर्तन घडविणारे, विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची बीजे पेरणारे म्हणून हे स्वयंसिद्धा युवती संमेलन आयोजित केले जाते. या संमेलनामध्ये राज्यातून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थीनी सहभागी होतात.
दिनांक २७ जानेवारीला दुपारी ४:०० वा. ज्येष्ठ पत्रकार मा. अशोक वानखेडे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या चार दिवसांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर विचारवंत, खेळाडू, अभ्यासक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व्यक्ती युवतींना मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये रोशीनी फाउंडेशन नागरिक विकास अध्ययन संस्थान पुणे, मा. प्रवीण निकम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक मा.डॉ. अभिजीत कुलकर्णी, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र पवार, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त -सचिव मा. सौ.सुनंदा पवार, मिटकॉन प्रमुख मा. गणेश खामगळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सांस्कृतिक विभागाचे समन्वयक मा. स्वामीराज भिसे, सांगलीच्या पोलीस उप अधीक्षक मा. राजश्री पाटील, मिसेस महाराष्ट्र, उपविजेता व माजी विद्यार्थिनी मा. प्रतीक्षा जगताप, भारतीय बेसबॉल कप्तान व माजी विद्यार्थ्यांनी मा. रेश्मा पुणेकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे, मुक्तांगण, पुणेच्या संचालिका मा.डॉ. मुक्ता पुणतांबेकर, लोकशाहीर मा.डॉ. राजू राऊत कोल्हापूर, नागरिक विकास अध्ययन संस्थान, पुणे येथील मा. मेघा नांगरे, मा. दिपाली क्षीरसागर, महाबळेश्वरचे अंध उद्योजक मा. डॉ. भावेश भाटिया, ‛स्वच्छ भारत’ राजदूत, कष्टकरी पंचायतच्या, पुणे येथील मा. सरूताई वाघमारे, मा. डॉ. चारुलता बापये, सुप्रसिद्ध कवी मा. नितीन चंदनशिवे, टेड टॉक स्पीकर, मा.अभिषेक ढवाण, ‛भिकाऱ्यांचे डॉक्टर’ मा. डॉ. अभिजीत सोनवणे, कर्जत- जामखेडचे आमदार मा.रोहित पवार, प्रेरणादायी वक्ते मा. श्री.इंद्रजीत देशमुख, अकलूज येथील सामाजिक कार्यकर्त्या मा. सौ. सविता व्होरा, इत्यादी मान्यवर आहेत.
स्वयंसिद्धा संमेलनामध्ये ‛माझे महाविद्यालय-आमच्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रम’ व ‛मी युथ आयकॉन- माझी उत्कृष्ट कामगिरी’ या दोन स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सहभागी महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रमाचे सादरीकरण सहभागी विद्यार्थ्यांनीकडून पावर पॉइंट च्या माध्यमातून सादरीकरण करावयाचे आहे. या दोन्ही स्पर्धांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन उपक्रम व ‛युथ आयकॉन’ पुरस्काराने गौरविण्यात येईल.
ज्या विद्यार्थिनींना या संमेलनामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी महाविद्यालयास फोन किंवा ई-मेल करून नाव नोंदवावे. राहण्याची व जेवणाची व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये असून प्रत्येक सहभागी विद्यार्थिनीला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील पुढील प्राध्यापकांशी संपर्क साधू शकता. स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख: ९९६०२५९०६७, उपप्राचार्य डॉ.मोहन निंबाळकर: ९७६६४४४४६९, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. परिमीता जाधव : ९०९६१९११०४, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रोहिदास लोहकरे: ९८२२७३०५६४