इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): जनतेच्या आशीर्वादाने आणि महायुती सरकारच्या विश्र्वासाने इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय(मामा) भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेबद्दल रविवार दि.22 डिसेंबर 2024 रोजी वाघ पॅलेस इंदापूर याठिकाणी जाहीर सत्काराचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी इंदापूर तालुका व शहर तसेच महायुतीचे सर्व घटक पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

2024 च्या विधानसभेत जनतेने पुन्हा एकदा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. हा विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासाठी अमूल्य असल्याचे ना.भरणे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मामांवर जो विश्र्वास दाखवत कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. येणार्या काळात राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी ही संधी सोनेरी ठरेल.