बारामती: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेबद्दल बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या सत्कारा दरम्यान बारामती शहरात निघणार्या मिरवणूकीत सुगंधीत गुलाबपाणीची फवारणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस बारामती शहरचे उपाध्यक्ष इफ्तेखार अन्सारभाई आतार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
इफ्तेखार आतार हे गेली दोन वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आलेले आहेत. मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कसबा बारामती येथून शहराच्या दिशेने विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीच्या मार्गावरती सुगंधित गुलाबपाणी अत्तराची फवारणी ब्लोअरच्या माध्यमातून करण्याचा मनोदय त्यांनी केला आहे.