बारामती : संविधान विचार मंच, बारामती यांच्यावतीने बारामती शहरामध्ये सोशल पेरेंटींग मुव्हमेंट हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती देणारी बैठक शनिवारी दि. २४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
शहरातील शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवणे, सामाजिक पालकत्वाची भावना रुजविणे, विद्यार्थ्यांना गुन्हेगारी तसेच व्यसनांपासून लांब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर येणारे अडथळे दूर करणे या उद्दिष्टाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सर्व पालकांना या उपक्रमात सभासद करून घेतले जाणार आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात कशा पद्धतीने राबविला जाईल याची माहिती या बैठकीतून दिली जाणार आहे. मार्केटयार्ड चौकाजवळ देवकाते हॉस्पीटलच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ नव्याने तयार झालेल्या मल्हार क्लबमध्ये या बैठकीचे आयोजन केले गेले आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे अशी विनंती संयोजकांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी राजेश कांबळे, ९११२२४००४५, घनश्याम केळकर-९८८१०९८१३८, मोहन गायकवाड – ९९२२४१५१३७ यांच्याशी संपर्क साधावा.