लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वडगाव मावळ कोर्टाने वीस वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशाल मधुकर लाखे अस शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. जे.एल.गांधी सेशन कोर्टाचे न्यायाधीश यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकारची बाजू सक्षमपणे कोर्टात मांडली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पाठपुरावा केला. आरोपी विशाल लाखे हा पीडितेच्या शेजारीच राहायचा.
अल्पवयीन मुलीसोबत ओळखीचं रूपांतर मैत्रीत मग प्रेमात झालं. लग्नाचे वचन, शपथा दोघांनी घेतल्या. लग्नाचे अमिश दाखवून विशाल ने पिडीतेवर अत्याचार केला. पीडित गर्भवती देखील राहिली. विशालने लग्न करण्यास नकार दिला. हे प्रकरण थेट तळेगाव एमआयडीसी पोलिसात गेलं. अखेर एक वर्षानंतर या प्रकरणी वडगाव मावळ कोर्टाने आरोपी विशाल लाखे यांना सश्रम २० वर्षांचा कारावास आणि दहा हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. वडगाव मावळ न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून स्मिता मुकुंद चौगले यांनी काम पाहिलं. न्यायालयात पीडित आणि इतर आठ साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयात हजर करून पुरावे सादर केले. यामुळे युक्तिवाद करणे सोपे झाले. सरकारकडून भक्कमपणे बाजू मांडण्यात सरकारी वकील यांना यश आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरती अर्जुन जाधव आणि यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.