मुलभूत गरजांसाठी आरपीआयने लक्ष वेधले : बारामती नगरपरिषदेस लेखी निवेदन सादर

बारामती(ऑनलाईन): येथील प्रबुद्धनगर आमराईत सार्वजनिक शौचालयाची झालेली अत्यंत दयनिय अवस्था, या मुलभूत गरजासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बारामती नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे.

याबाबत मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देते समयी आरपीआय(आठवले) पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे, आरपीआय(आठवले) पश्र्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा रत्नप्रभा साबळे, बाळा लोंढे आदी इ. सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रबुद्धनगर येथील सार्वजनिक शौचालयाची दारे, खिडक्या तुटलेले असून विद्युत प्रकाशाची देखील व्यवस्था अपुरी आहे. पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नसल्यामुळे शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

तरी तत्काळ सदर प्रकरणाची दखल घेऊन उपरोक्त सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणेबाबत संबंधितांना सूचना करण्यात याव्यात तसेच आमराई परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!