मुंबई: राज्यातील आनंदाची बातमी म्हणजे कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचा दर 75.36 टक्के आला आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यावर घाबरून न जाता तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
पॉझिटीव्ह आल्यानंतर तुमची लक्षणे कोणती आहेत ती किती गंभीर आहेत हे पाहुन त्यानुसार पुढचे निर्णय डॉक्टर घेत असतात. सगळ्यांनाच भिती वाटते स्वाभाविक आहे. तात्काळ उपचार सुरू केला तर या आजारावर सुद्धा मात करता येते. 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे तुम्ही का करू शकत नाही.
ज्यावेळी प्रथम वुहानमधील रूग्ण ताब्यात घेतली त्यावेळी त्या रूग्णांना न्यूमोनियाची लक्षणे दिसत होती. फुफ्फुसात त्रास जाणवत होता. फुफ्फुसातून ऑक्सिजन रक्तात सामील होत होते तिथे पाणी जमा झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेने 13 लक्षणेंची यादी दिलेली आहे. ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे ही कोरोनाची लक्षणं आहेत.
पूर्वी ही लक्षणांची यादी फक्त ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास, एवढीच होती. आता नव्याने जगभरातल्या काही रुग्णांना कंजंक्टीवायटीस (डोळे येणे), त्वचेवर लाल चट्टे, पुरळ उठणे, हातापायांच्या बोटांवर, तळव्यांवर चट्टे उठणे, अतिसार किंवा हगवण लागणे, अंगदुखी, गंभीर लक्षणं, छाती दुखणे, छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे, वाचा जाणे, शरीराची हालचाल थांबणे ही लक्षणं कोरोनाबाधितांमध्ये दिसून येत असल्याचे समजते.